स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक अटॅक का आला, डॉक्टरांनी सांगितलेलं कारण ऐकून व्हाल शॉक

Published : Nov 24, 2025, 09:45 AM IST

क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे लग्न तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने पुढे ढकलण्यात आले आहे. लग्नाच्या अवघ्या ३ तास आधी ही घटना घडली, ज्यानंतर तिच्या वडिलांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

PREV
16
स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक अटॅक का आला, डॉक्टरांनी सांगितलेलं कारण ऐकून व्हाल शॉक

स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळं तीच लग्न पुढं ढकलण्यात आलं आहे. तिच्या लग्नविधीचे कार्यक्रम तीन दिवसांपासून सुरु होते. लग्नविधीला ३ तास बाकी असताना दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आहे. 

26
स्मृतीच्या वडिलांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

स्मृतीच्या वडिलांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. . या रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणं होती.

36
मुलीच्या लग्नात झालेल्या धावपळीमुळं आला झटका

मुलीच्या लग्नात झालेल्या धावपळीमुळे, कामांमुळे त्यांना शारीरिक किंवा मानसिक ताण आला असावा आणि त्यामुळेच हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

46
नेमकं काय झालं?

स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना सकाळी ११.३० च्या सुमारास छातीत डावीकडे दुखायला लागलं. हृदयविकारासारखी लक्षण दिसून आल्यामुळं तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

56
सतत निरीक्षणात ठेवलं जातंय

त्यांच्या हृदयातील एन्झाइम्स किंचित वाढले असले तरी त्यांना सतत निरीक्षणाची आवश्यकता आहे. आमचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनीही त्यांची तपासणी केली आहे. इकोकार्डिओग्रामवर कोणतेही नवीन निष्कर्ष नाहीत.

66
शुक्रवारी सकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडला

शुक्रवारी सकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडला. . टीम इंडियातील जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा, रेणुका सिंह या स्मृतीच्या खेळाडू मैत्रीणींनीही लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Read more Photos on

Recommended Stories