
भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर आणि डर्बिन गार्डियन्सचा कॅप्टन रविचंद्रन अश्विन नेहमीच त्याच्या बॉलिंगमधील प्रयोगांसाठी ओळखला जातो. आता त्याने युरोपियन T20 प्रीमियर लीग (ETPL) 2026 मध्ये एक नवीन बॉलिंग ॲक्शन सादर केली आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी हेग येथील स्पोर्टपार्क वेस्टव्ह्लिएट मैदानावर हा सामना झाला.
या सामन्यात ॲमस्टरडॅम फ्लेम्सने डर्बिन गार्डियन्सचा नऊ रन्सने पराभव केला. यासोबतच डर्बिन गार्डियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर ॲमस्टरडॅम फ्लेम्सचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय होता. १७० रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना गार्डियन्सचा संघ २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावून १६० रन्सच करू शकला. सलामीवीर जेम्स विन्सने ४६ बॉल्समध्ये ७३ रन्सची शानदार खेळी केली, ज्यात १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली.
फ्लेम्सकडून टिम प्रिंगल (३/२२), आर्यन दत्त (२/२८) आणि रिचर्ड ग्लीसन (२/३८) यांनी महत्त्वाच्या विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हे पण वाचा: ETPL 2026: ॲमस्टरडॅम फ्लेम्सचा डब्लिन गार्डियन्सवर नऊ रन्सने विजय
डर्बिन गार्डियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असला तरी, कॅप्टन रविचंद्रन अश्विनची नवीन बॉलिंग ॲक्शन चर्चेचा विषय ठरली आहे.
अश्विन नेहमीच आपल्या बॉलिंगमध्ये कॅरम बॉल, आर्म बॉल आणि स्लायडरसारखे प्रयोग करत असतो. ॲमस्टरडॅम फ्लेम्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या बॉलिंग ॲक्शनमध्ये पूर्णपणे बदल केला.
युरोपियन T20 प्रीमियर लीगने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, अश्विन एका वेगळ्याच ॲक्शनने बॉलिंग करताना दिसला. स्मिथला बॉलिंग करताना त्याने आपला रन-अप छोटा केला आणि बॉल टाकताना साईड-ऑन पोझिशनमध्ये येत होता. नेदरलँड्सच्या खेळपट्ट्यांवरून अतिरिक्त बाऊन्स मिळवण्यासाठी त्याने हा बदल केल्याचं दिसतंय.
Ravi Ashwin with a new bowling action in the ETPL. pic.twitter.com/HlbHYbC0Fp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 5, 2026
या सामन्यात रविचंद्रन अश्विनने आपल्या चार ओव्हर्समध्ये ४.५० च्या इकॉनॉमी रेटने फक्त १८ रन्स देत ऑस्ट्रेलियन बॅट्समन टिम डेव्हिडची एक महत्त्वाची विकेट घेतली.
या अनुभवी ऑफ-स्पिनरने पुन्हा एकदा आपली बॉलिंगची जादू दाखवली आणि आपल्या कारकिर्दीत आणखी एका नवीन प्रयोगाची नोंद केली.
अश्विनच्या या नव्या बॉलिंग ॲक्शनवर सोशल मीडियावर, विशेषतः X वर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. चाहते आणि क्रिकेटप्रेमी त्याच्या सतत नवीन काहीतरी करण्याच्या वृत्तीचे कौतुक करत आहेत.
अनेकांनी अश्विनला 'जीनियस' म्हटले आहे, तर काहींनी त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावरही सतत नवीन गोष्टी शिकण्याच्या इच्छेचे कौतुक केले आहे. काही चाहत्यांना अश्विन आणि स्मिथ यांना पुन्हा एकदा आमनेसामने पाहून जुन्या दिवसांची आठवण झाली.
Ashwin experimentation stops for no one, even against Steve Smith! Absolute legend. 🐐
— pullshot fortyfive. (@Imyashhhh45) September 5, 2026
Retirement from international cricket clearly didn't retire the scientist in Ashwin. :D
— The Conviction Club 🥇 (@SearchGood) September 5, 2026
Ashwin experimenting against Steve Smith? 👀🔥 The master of variations is still finding new tricks! Cricket never stops teaching us something new. 🧠🏏
— Amna Malik (@amna_malik127) September 5, 2026
#Ashwin v #SteveSmith ...reminds of such great moments over the years. https://t.co/nqM5osxPUw
— movieman (@movieman777) September 5, 2026
Ashwin is genuinely a genius, man. 👏🔥
He has retired from international cricket and isn’t even playing the IPL anymore. We all know how great Ashwin is and how much he has already achieved in the game.
At this stage, he doesn’t really need to learn anything new. Yet, he is…— FailedCricketer (@FailedCrickt) September 5, 2026
Ravi Ashwin collecting his Bowling actions like Infinity stones pic.twitter.com/BqVwSmKMDJ
— Haydos🛡️ (@GovindIstOdraza) September 5, 2026
𝗥𝗔𝗩𝗜𝗖𝗛𝗔𝗡𝗗𝗥𝗔𝗡 𝗔𝗦𝗛𝗪𝗜𝗡 WITH A NEW BOWLING ACTION! 👀🔥
The Professor is adding a new dimension to his game in the ETPL. 🧠🎯#ETPL #Smith #Ashwin #INDvsPAK#Pakistanwomen #Indianwomen pic.twitter.com/cmfeTlYLjg— SAHIL NAGPAL (@Pavilionpulse) September 5, 2026
Not about his YT videos but something about Ashwin, the bowler is so fascinating. He's always trying to find ways to keep batters on their toes. Always trying to improve himself, always trying to outfox the batter. Love it genuinely https://t.co/HDY29PyNn2
— Alaska (@alaska0811) September 5, 2026
Why isn't trying to take his hands away from Smith here? Or does T20 not require it? https://t.co/sBLNWAZSW7
— Blackwater Park (@demonofthefall4) September 5, 2026
या स्पर्धेत अश्विनची कामगिरी आतापर्यंत सामान्य राहिली आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये ३१.२५ च्या सरासरीने आणि ६.२५ च्या इकॉनॉमी रेटने फक्त ४ विकेट्स घेतल्या आहेत. बॅटिंगमध्ये त्याने ४ डावांमध्ये ६.०० च्या सरासरीने फक्त २४ रन्स केले आहेत.
हे पण वाचा: ETPL: एडिनबर्ग रॉकर्सचा रोटरडॅम डॉकर्सवर ५५ रन्सने विजय