KL Rahul Test Century: केएल राहुलचं न्यूझीलंडमध्ये पहिलं कसोटी शतक, भारताचं मजबूत वर्चस्व

vivek panmand   | CMS
Published : Nov 21, 2026, 03:34 PM IST
photo

सार

केएल राहुलने न्यूझीलंडमध्ये पहिलं कसोटी शतक झळकावलं आहे. याचसोबत चारही सेना (SENA) देशांमध्ये कसोटी शतक करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर बनला आहे. वेलिंग्टनमधील पहिल्या कसोटीत त्याच्या १३६ धावांच्या खेळीमुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे.

KL Rahul Hits Maiden Test Century In New Zealand As India Dominates

वेलिंग्टन [न्यूझीलंड], २१ नोव्हेंबर (एएनआय): भारतीय फलंदाज केएल राहुलने न्यूझीलंडमधलं आपलं पहिलं कसोटी शतक खास असल्याचं म्हटलं आहे. इथल्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वोत्तम गोलंदाजीसमोर खेळायला आपण उत्सुक होतो, असं तो म्हणाला. गेल्या सहा-सात महिन्यांपासून आपण या संधीसाठी जोरदार तयारी करत होतो, न्यूझीलंडमधील यशस्वी कामगिरीचा अभ्यास केला आणि तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी लवकर पोहोचलो, असंही त्याने सांगितलं.

शनिवारी वेलिंग्टनमध्ये राहुलने शानदार शतक झळकावून रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव कोरलं. न्यूझीलंडमध्ये पहिल्याच कसोटी डावात शतक करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ३४ वर्षीय राहुलने आणखी एक मोठा टप्पा गाठला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चारही सेना (SENA) देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर बनला आहे. हे त्याचं १३ वं कसोटी शतक होतं. “वेगवेगळ्या देशांमध्ये आणि आव्हानात्मक परिस्थितीत खेळण्याची नेहमीच इच्छा असते. न्यूझीलंडमध्ये अनेक फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, कारण इथली परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. मला इथे कसोटी सामना खेळायचा होता. आधी मला ही संधी मिळाली नव्हती. त्यामुळे जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी तिचं सोनं करायचं ठरवलं होतं. म्हणूनच मी लवकर इथे आलो आणि परिस्थितीशी जुळवून घेतलं,” असं राहुलने शनिवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांना सांगितलं.

काय म्हटला राहुल?

आपल्या पहिल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी आपण गेले सहा ते सात महिने तयारी करत होतो, असं राहुलने उघड केलं. इथल्या आव्हानात्मक परिस्थितीत यशस्वी झालेल्या फलंदाजांचा आपण अभ्यास केल्याचं तो म्हणाला. लवकर येऊन केलेली जोरदार तयारी फायद्याची ठरली, असंही त्याने स्पष्ट केलं. “न्यूझीलंडमध्ये लाल चेंडूने खेळण्याचा मला आधी अनुभव नव्हता. त्यामुळे मी खूप आधीपासून तयारी सुरू केली होती. गेल्या सहा-सात महिन्यांपासून मी इथे कसोटी खेळण्याचा विचार करत होतो. ज्या फलंदाजांनी इथे धावा केल्या आहेत, त्यांचा अभ्यास करत होतो. खूप तयारी आणि मेहनत यामागे होती. एकदा तुम्ही मैदानाबाहेर सर्व तयारी केली की मैदानावर उतरल्यावर गोष्टी थोड्या सोप्या होतात,” असंही तो म्हणाला.

शनिवारी वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ४ बाद ४८६ धावा केल्या. केएल राहुलच्या शानदार शतकामुळे भारताने पहिल्या कसोटीवर आपली पकड घट्ट केली. राहुलच्या १३६ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात न्यूझीलंडवर ११८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा संघ ३६८ धावांवर सर्वबाद झाला होता. (एएनआय)

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

IND vs NZ 1st Test 2026: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा नवा विक्रम, राहुल-गिलने कोणता रेकॉर्ड मोडला?
KL Rahul Century: '६-७ महिन्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं,' न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर राहुलची प्रतिक्रिया