
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये इंडिया टीमचा विजय झाला आहे. ऑपरेशन सिंधूर क्रिकेटमध्ये यशस्वीरीत्या पार पडलं आहे. पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा गुडग्यावर आणल्यानंतर पाकिस्तानच्या नांग्या ठेचून टाकलं आहे. पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सूर्यकुमार यादवने पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.
सूर्यकुमारला राग आला आणि मोहसीन नक्वी हे ताटकळत उभे राहिले होते. त्यानंतर मोहसीन यांना राग आला आणि त्यांनी तिथून पळ काढला. मोहसिन नक्वी यांच्या हातून आम्हाला ट्रॉफी नको, त्यांनी स्टेजवरून खाली उतरावं, अशी मागणी टीम इंडियाने केली होती. त्यानंतर मोहसिन नक्वी यांना राग आला अन् त्यांनी टीम इंडियाला ट्रॉफी दिली नाही.
भारताने सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने अडीच वाजता घोषणा केली. पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. या पूर्ण स्पर्धेमधील प्रत्येक सामन्याची माझी मॅचची फी सैन्य दलाला देणार आहे. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमारने सांगितले की, ही फक्त एक ट्रॉफी नाही, ही देशाच्या सन्मानाशी जोडलेली भावना आहे. आपले जवान सीमारेषेवर आपल्यासाठी लढतात, तर आम्ही मैदानावर लढतो. माझ्या दृष्टीने या विजयाचा खरा मान त्यांचाच आहे. सूर्यकुमारच्या या निर्णयाचं कौतुक सोशल मीडियावरुन जगभरातून केलं जातं आहे.