
आशिया करंडक स्पर्धेत आज होणाऱ्या भारत पाकिस्तान संघांमध्ये सामना पार पडणार आहे. यावेळी बक्षीस समारंभ आयोजित केला जाणार असून याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. या सामन्यानंतर विजेत्या संघाला आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. ते सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत.
यावेळी बक्षीस समारंभासाठी नक्वी हे उपस्थित राहणार असून आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष या नात्याने ते येथे राहणार आहेत. विजेत्या संघाला यावेळी पारितोषिक वितरण केले जाणार आहे. यावेळी भारतीय संघ नक्वी यांच्या उपस्थितीत पुरस्कार घेणार का हा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
भारत पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव हा पहलगाम हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये असं काही प्रेक्षकांनी म्हटलं होतं. आयसीसी स्पर्धेच्या व्यतिरिक्त भारत पाकिस्तान सोबत एकही मॅच खेळणार नसल्याचं यावेळी बीसीसीआयने म्हटलं आहे. या तणावामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन करणे टाळले होते.
भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंकडे बघत नसल्याचं मागील स्पर्धेतून दिसून आलं होतं. अशावेळी बक्षीस समारंभाच्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये आज तिसरा सामना पार पडत आहे. त्यामुळं आज नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.