Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज संध्याकाळी ८ वाजता रंगणार आहे, पण सामन्यापूर्वी अनेक राजकीय आणि भावनिक वादळ उठले आहे. टीम इंडियातही आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे आज सामना होणार की नाही, असे विचारले जात आहे.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय संघाने हा सामना खेळू नये, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. बीसीसीआयने सामना खेळण्याची परवानगी दिली असली तरी अनेक नेत्यांनी जाहीरपणे या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. एवढेच नव्हे तर पहलगाम हल्ल्यातील काही शहिदांच्या पत्नीनेही हा सामना होऊ नये असे म्हटले आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने या मॅचला जोरदार विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी युद्ध आणि सामना सोबत कसे होऊ शकतो, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
25
खेळाडूंसोबत बैठक
सामन्याला काही तास शिल्लक असताना, टीम इंडियाच्या गोटातूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक खेळाडूंच्या मनातही हा सामना खेळू नये अशी भावना आहे. संपूर्ण देशातून होणारा विरोध पाहता, संघातही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, कोणताही खेळाडू जाहीरपणे बोलण्यास तयार नाही. खेळाडूंच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह सर्व सपोर्ट स्टाफने खेळाडूंशी चर्चा केली. त्यांनी खेळाडूंना 'व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून सामन्याकडे पहा' असा सल्ला दिला आहे. खेळाडू वृत्ती जागृत ठेवून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करा असेही सांगण्यात आले आहे.
35
मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे नेहमीच तणावपूर्ण आणि उत्कंठावर्धक असतो. मैदानाबाहेरही या सामन्याचे महत्त्व खूप मोठे असते. या सामन्याला भावनिक किनार असल्याने दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या संघांची ताकद पाहता पाकिस्तानचा संघ भारतापुढे किती मोठे आव्हान उभे करेल, हा प्रश्नच आहे.
भारतीय गोलंदाजांना रोखण्यापेक्षा भारतीय फलंदाजांना थांबवण्याचे मोठे दडपण पाकिस्तानच्या संघावर असणार आहे. शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे कोणत्याही गोलंदाजीची धुलाई करू शकतात. पाकिस्तानचा फाहीम अश्रफ एक चांगला अष्टपैलू मानला जातो, पण तो हार्दिक पांड्याप्रमाणे एकहाती सामना जिंकून देऊ शकत नाही.
55
शाहीन आफ्रिदी
पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदीने २०२१ च्या स्पर्धेत याच मैदानावर लोकेश राहुल आणि रोहित शर्माला एकाच षटकात बाद केले होते, पण त्यानंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे. आता त्याला चेंडू उशिरा स्विंग करता येत नाही, ज्यामुळे त्याची भेदकता कमी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे भारताचे फलंदाज काय कमाल करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.