Asia Cup 2025 Ind vs Pak : कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध जिंकायचंच, असा निश्चय केलेल्या पाकिस्तानने आता सुपर 4 सामन्यापूर्वी एका नवीन मास्टर प्लॅन आणि नव्या मानसिकतेसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट येथे वाचा.
2025 च्या आशिया कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ समोरासमोर आले होते. 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा दारुण पराभव झाला.
26
दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन टाळले
इतकंच नाही, तर भारतीय खेळाडूंनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करणं तर दूरच, त्यांच्याकडे पाहिलंही नाही. त्यांनी आपल्या खेळातून आणि वागणुकीतून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.
36
पाकिस्तानविरुद्धचा विजय सैन्याला समर्पित
सामन्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आणि भारतीय सैन्याला समर्पित केला. यामुळे पाकिस्तानच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळले गेले.
भारताविरुद्धचा दारुण पराभव आणि आशिया कपमधील सामान्य कामगिरीमुळे आत्मविश्वास गमावलेल्या पाकिस्तान संघाने रविवारच्या सामन्यापूर्वी एका प्रेरणादायी वक्त्याला (Motivational Speaker) बोलावले आहे.
56
पाकिस्तानने डॉ. राहील करीम यांना बोलावले
या माध्यमातून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉ. राहील करीम बुधवारी संघात सामील झाले असून ते स्पर्धेत संघासोबतच राहतील.'
66
आज भारत-पाक सुपर-4 लढत
सुपर 4 मधून फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. यावेळी पाकिस्तानची बाजू बळकट राहावी यासाठी ही निती अवलंबली जात आहे.