Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष राहणार की जाणार? चर्चांना पूर्णविराम, थेट चेन्नईत लावली हजेरी

vivek panmand   | CMS
Published : Sep 06, 2026, 06:32 PM IST
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष राहणार की जाणार? चर्चांना पूर्णविराम, थेट चेन्नईत लावली हजेरी

सार

वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर कायम राहणार की नाही, या चर्चांना उधाण आलेलं असताना, आगरकर थेट दुलीप ट्रॉफी फायनलसाठी चेन्नईत पोहोचले आहेत. नेटवर्क नसल्याने ते BCCI च्या बैठकीला हजर राहू शकले नाहीत, असं सचिवांनी स्पष्ट केलंय.

चेन्नई: भारतीय क्रिकेट संघाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेली दुलीप ट्रॉफीची फायनल मॅच पाहण्यासाठी पोहोचले आहेत. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर राहिल्याने त्यांच्या पदाविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आगरकर थेट स्टेडियममध्ये दिसले. साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात हा अंतिम सामना सुरू आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, "ही बैठक अचानक बोलावण्यात आली होती. त्यावेळी आगरकर बाहेर होते आणि ज्या ठिकाणी होते तिथे नेटवर्कची समस्या होती. त्यामुळे ते ऑनलाइनसुद्धा बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत." आगरकर यांच्या करारावर (contract) बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत फक्त इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यातील कामगिरी, श्रीलंकेतील कसोटी मालिका आणि आगामी वर्ल्ड कप यावरच चर्चा झाली, असं सैकिया यांनी सांगितलं.

या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कसोटी आणि वनडेचा कॅप्टन शुभमन गिल आणि टी-20 चा कॅप्टन श्रेयस अय्यर हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, आगरकर चेन्नईला पोहोचण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. आगामी काळात होणाऱ्या इंडिया 'ए' संघाच्या निवडीसाठी खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी ते आले आहेत. पुढच्या दोन महिन्यांत इंडिया 'ए' संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ निवडताना दुलीप ट्रॉफीमधील कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: भारत-पाक मॅचमध्ये पाकिस्तानी फॅनने गायलं 'जन गण मन', व्हिडिओने जिंकली मनं!
Ashwin's New Action: स्मिथला चक्रावून सोडण्यासाठी अश्विनचा नवा 'पॅटर्न', बॉलिंग ॲक्शनचा व्हिडिओ व्हायरल!