
मुंबई : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास सुरू आहे. अशातच प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संगीता तिवारी यांनी मुख्य आरोपी सिया गोयलविरोधात अनेक गंभीर दावे केले आहेत. याशिवाय हत्येच्या कटात भावाचाही समावेश असेल असे विधान केल्याने चर्चा अधिक सुरू झाली आहे.
संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, केतन अग्रवाल यांचा खून हा पूर्णपणे पूर्वनियोजित होता. आरोपीने थंड डोक्याने रचलेला कट होता. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणीही संगीता तिवारी यांनी केली. तसेच तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करावा.
तिवारी यांनी असा दावा केला की, सिया गोयलने लग्न होणार नसल्याचे आधीच आपल्या काही मैत्रिणींना सांगितले होते. तसेच प्रवासासाठी तिकीट बुक करण्याच्या कारणावरून तिने एका मैत्रिणीकडे आधार कार्ड मागितले. यासंदर्भातील १४ मे रोजीचे कथित चॅट पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. मात्र या कथित चॅटची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
पत्रकार परिषदेत संगीता तिवारी यांनी सिया गोयलच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही गंभीर आरोप केले. संगीता तिवारींनी काही व्हिडिओ आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. मात्र, या सर्व आरोपांबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तपास यंत्रणांनीही या दाव्यांवर अद्याप भाष्य केलेले नाही.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी 3 जुलैला संपली. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने निर्णय देत सिया आणि चेतनला आणखी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय न्यायालयामध्ये तपास अधिकाऱ्यांना आरोपींच्या मोबाइलमधील डेटा मिळवला आहे. या डेटामध्ये काही कोड वर्ड्स आणि निकनेमचा वापर केल्याचे समोर आले आहे. डिलिट करण्यात आलेला डेटाही पोलिसांनी पुन्हा मिळवला आहे..