
मुंबई: आज महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान चांगलं राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि परिसरात आकाश ढगाळ असणार आहे, मात्र जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, हवामान विभागाकडून आज मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा देण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि काही भागांत किरकोळ सरी पडल्याचे निदर्शनास आले आहे.
कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून, हवामानात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात वातावरण उबदार आणि दमट राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, सध्या कोणत्याही भागात रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला नाही. मात्र, ढगाळ हवामानामुळे अचानक पावसाचा अंदाज नाकारता येणार नाही. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार आहे, मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी.