उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द, भीमाच्या लेकीचा केला आवर्जून उल्लेख

Published : Jun 19, 2026, 11:15 PM IST
bmc election results 2026 shiv sena ubt vs eknath shinde mayor politics

सार

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी 'लाडकी बहीण' योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असे वचन दिले आणि महायुती अभेद्य असल्याचे सांगितले. तसेच, पक्षात कार्यकर्त्यालाच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण केलं. त्यांनी शिवसेनेचा पक्ष, शिवसेना पक्षाची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल यावर भाष्य केलं आहे. कार्यकर्ता पुढं आला पाहिजे, आमच्या पक्षात कोणाचा वशिला चालत नाही अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या भाषणात शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहीण योजनेवर भाष्य केलं.

लाडकी बहीण सुखकर झाली पाहिजे 

आमची महायुती अशीच पुढे कायम राहिले पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात वाद निर्माण केला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचे प्रयत्न सफल होणार नाही. आमचा अजेंडा हा लोकांच्या आयुष्यात बदल करणे हा आहे. महाराष्ट्रात महायुती वेगाने पुढे जाणार आहे. अडीच वर्षाच्या काळात सगळ्या गोष्टीवरची स्थगिती काढून टाकली.

शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहीण आणि वारकरी सुखकर व्हायला हवेत. लाडक्या बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. मी माझ्या आईची बहिणीची काटकसर जवळून पहिली आहे. कोणी माईचा लाल आला तर लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही. हा शब्द मी लाडक्या बहिणींना देतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

भीमाच्या लेकीला केलं खासदार 

भीमाच्या लेकीला खासदार केल्याचा उल्लेख यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मंचावरच्या अनेकांनी आपल्या मुलांसाठी तिकीट मागितलं पण मी कार्यकर्त्याला तिकीट भेटलं पाहिजे या भूमिकेत होतो. त्यानंतर या सर्वांनीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील असं म्हटलं आहे. यावेळी शिंदे यांनी सहकाऱ्यांचा कौतुक केलं आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट