मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मनसेचा अजेंडा शोधा, भाजपा प्रवक्त्याने राज ठाकरे यांनी दिला टोला

Published : Jul 09, 2026, 11:49 PM IST
Raj Thackeray Speech

सार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मिसिंग लिंक'वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, मनसेचा अजेंडाच गेल्या १८ वर्षांपासून मिसिंग असून राज ठाकरेंनी आधी आत्मचिंतन करून आपले घसरलेले इंजिन मार्गावर आणावे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावेळी मिसिंग लिंकवरून त्यांनी फडणवीस यांना टार्गेट केलं होतं. यावेळी बन यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी मनसे पक्षाचा अजेंडा हा १८ वर्षांपासून मिसिंग असून त्याकडं राज यांनी आधी लक्ष द्यावं असं राज यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंक केला सुरु 

पुण्याकडून मुंबईला येणाऱ्या रस्त्यावरचा मिसिंग लिंकवर दरड कोसळली होती. त्यानंतर १८ तासांमध्ये हा मिसिंग लिंक परत सुरु केला. पण ज्या पक्षाचा अजेंडा १८ वर्षांपासून गायब आहे त्यावर राज यांनी सर्वात आधी लक्ष द्यावं. ते देवभाऊंवर टीका करू राहिलेत, महाराष्ट्र कोणाला गांभीर्याने घेतोय ते आपल्याला माहिती आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत जनतेनं उत्तर दिलं 

महापालिकेच्या निवडणुकीत जनतेनं उत्तर दिल आहे. राज ठाकरे यांनी आपलं घसरलेला इंजिन कस मार्गावर येईल याकडं लक्ष द्यावं. त्यांनी स्वतःच आत्मचिंतन केलं तर त्यांना मार्ग सापडायला मदत होईल. नवनाथ बन यांनी यावेळी भाजपाची बाजू मांडली आहे. आता पुढं काय होईल ते लवकरच दिसून येईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Security Breach : PMO चे बनावट अधिकारी बनून मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी, बंदूकधारी अटकेत
Work From Home : ऑफिसमध्ये बसून जास्त काम होतं हा गैरसमज; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल