मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाढवून वेळ मिळणार का, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Published : Aug 29, 2025, 07:00 PM IST
CM Fadnavis on Manoj Jarange

सार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर धरणे सुरू झाले आहे. 

मुंबई: राज्यात सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धूम सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात दर्शन घेण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळं भाविकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडत आहे. आता मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मुंबईत धरणे धरायला सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून धरणे धरायला सुरुवात केली आहे. आज मुंबईतील आझाद मैदानावर धरणे धरायला सुरुवात केली आहे. मराठा आंदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं अवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मनोज जरांगे उपोषणाची बसले आहेत.

मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची समजून काढल्यानंतर ते बाजूला झाले. जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करण्याचे अवाहन केले होते. शासनाची सहकार्याची भूमिका झाली असून लोकशाही आंदोलन पद्धतीने होत असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.

कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांपुढं येऊ नयेत हीच आमची आहे. मागील १० वर्षांच्या युतीच्या काळात मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. त्या काळात इतर कोणत्याही पक्षाच्या काळात न्याय देण्यात आला नाही. शिक्षण आणि रोजगाराच्या योजना आमच्या काळात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत.

शिंदे समितीला देण्यात आली मुदतवाढ

 शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळं किती दिवस आंदोलन चालणार हा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस नियमांचे पालन करणार आहेत. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील हा मुद्दा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा