राम मंदिर चोरीचा तपास लागेपर्यंत शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

Published : Jul 05, 2026, 09:35 PM IST
uddhav Thackeray

सार

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 'रामरक्षा आंदोलना'ची घोषणा केली आहे. राम मंदिरासाठी दिलेल्या दानाचे आणि शिवसेनेने दिलेल्या चांदीच्या विटेचे काय झाले, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली असून सर्वांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई - शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली. आता उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोनच दिवसांपूर्वी याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार संजय राऊत हे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं आहे. आम्ही भोळे भाबडे हिंदू आहेत. पण आम्ही मूर्ख नाही. कुणी मंदिर लुटत असेल तर तर हिंदू कधीही माफ करणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. राम मंदिराला केलेलं सगळं दान कुठं गेलं, असा प्रश्न ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला लाज वाटली पाहिजे 

हिंदूंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला भाजपयुक्त हिंदू हवा आहे. त्यामुळं आता राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. शिवसेनेनं राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठंय? राम रक्षा आंदोलन म्हणजे भर पावसात पेटलेली ठिणगी आहे. या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. भविष्यात हे आंदोलन अधिक जास्त तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट, सचिन वाझेंच्या नियुक्तीवर वकिलांचा गंभीर आरोप
NABKISAN Social Bond: नॅबकिसानने देशातील पहिल्या 'वॉश' सोशल बाँडमधून उभारले १८० कोटी