
मुंबई: मुंबईत अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आता परत एकदा दुर्घटना घडली आहे. मुंबईत झाड कोसळून एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. कुर्ला येथील नौपाडा भागात झाड पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचं नाव युनूस कुंदावाला असं असून या घटनेमुळं मुंबईकर जनता संतप्त झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शाळकरी बसवर झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
सुसाट वाऱ्यामुळं दुकानावर झाड पडलं. या घटनेची माहिती नगरसेवकाच्या स्वीय सहायकाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन ऑफिसला कळवली. झाड कोसळले, त्यावेळी युनूस हे त्यांच्या दुकानातच होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. पण तिथं जाईपर्यंत त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता.
हि घटना घडून गेल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित पोलिसांना मनसेचे कार्यकर्ते भिडले. या घटनेमुळं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. या घटनेला ४ ते ५ तास होऊ गेल्यानंतर महानगपालिकेचा एकही पदाधिकारी घटनास्थळी आला नव्हता. त्यामुळं आंदोलन करणारे संतप्त झाले होते.
आरे कॉलनी येथे झाड कोसळून एका व्यक्तीचा बळी गेला आहे. या ठिकाणी एक झाड कोसळलं, त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. झाड कोसळण्याच्या घटना वाढल्यामुळं महानगरपालिकेकडून अलर्ट जारी करण्यात आला.