Weather Update: कोकणातील पाऊस थांबला, मुंबई ठाण्यात पडणार कमी पाऊस, पालघरमध्ये सरी बरसणार

Published : Aug 24, 2025, 01:00 PM IST

कोकणात पावसाचा जोर कमी झाला असून, मुंबई आणि ठाण्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघरमध्येही पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

PREV
15
Weather Update: कोकणातील पाऊस थांबला, मुंबई ठाण्यात पडणार कमी पाऊस, पालघरमध्ये सरी बरसणार

मुंबई आणि कोकणातील पाऊस थांबला असून नोकरदारांची तारांबळ कमी होणार आहे. त्यामुळं पाण्याचं प्रमाण साचून वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.

25
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर झाला कमी

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत चालला आहे. कोकणात पाऊस पडल्यानंतर आता हवामान विभागाने पाऊस न पडल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

35
साधारण स्वरूपाचा पडणार पाऊस

आज साधारण स्वरूपाचा पाऊस पडणार असून असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड जिल्ह्यास येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

45
मुंबईत हलक्या फुलक्या पावसाच्या धारा पडणार

मुंबईत पावसाच्या हलक्या फुलक्या धारा आज पडणार आहेत. दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी पडतील. मुंबईत आज पाऊस कमी पडणार असल्यामुळे काळजीची चिंता नाही.

55
पालघर जिल्ह्यात पडणार कमी पाऊस

24 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहणार आहे. हवामान खात्याने या भागाला कोणताही अलर्ट दिलेला नाही.

Read more Photos on

Recommended Stories