World Vada Pav Day : चव, संस्कृती आणि स्ट्रीट फूडचा राजा, वडापावचा जन्म कसा झाला?; 'या' माणसाने केली सुरुवात!

Published : Aug 23, 2025, 08:16 PM IST

World Vada Pav Day : मुंबईच्या गर्दीतला गरमागरम वडापाव ही एक चव नाही तर एक भावना आहे. १९७० च्या दशकात अशोक वैद्य यांनी सुरू केलेला हा पदार्थ आज जगभरात पोहोचला आहे.

PREV
16

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे गर्दीने गजबजलेली लोकल ट्रेन आणि हातातला गरमागरम वडापाव! आज २३ ऑगस्ट रोजी जगभरात ‘वर्ल्ड वडापाव डे’ म्हणून साजरा होणारा हा दिवस मुंबईच्या अस्सल चवीचा आणि मेहनतीचा गौरव करतो.

26

अशोक वैद्य यांनी तयार केला पहिला वडापाव

हा साधासुधा दिसणारा वडापाव कसा जन्माला आला, याची कहाणी फारच रंजक आहे. १९७० च्या दशकात दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य नावाच्या एका दूरदृष्टीच्या माणसाने वडापावची सुरुवात केली. त्यांच्या चहाच्या टपरीवर त्यांनी बटाटावडा आणि पाव एकत्र करून एक असा खाद्यपदार्थ तयार केला, जो त्या वेळी फक्त दोन-तीन रुपयांना मिळत होता.

36

वडापाव चवीमुळे झाला लोकप्रिय

मुंबईतील गिरण्यांमध्ये काम करणारे कामगार, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कामासाठी धावणारे प्रवासी- अशा प्रत्येकाला भूक भागवण्यासाठी एक सोपा, स्वस्त आणि पोटभरीचा उपाय मिळाला. सुरुवातीला फक्त दुपारी २ ते संध्याकाळी ६ या वेळेत मिळणारा हा वडापाव, त्याच्या सोपेपणामुळे आणि चवीमुळे झपाट्याने लोकप्रिय झाला. आज तो २४ तास कुठेही उपलब्ध असतो.

46

वडापाव म्हणजे फक्त एक खाद्यपदार्थ नाही, तर एक भावना 

किफायतशीर पण पोटभरीचा: कमी किमतीत भरपेट जेवण देणारा हा पदार्थ सर्वसामान्यांचा आधार बनला.

धावपळीत सोबती: हातात धरून चालता-चालता खाता येणारा वडापाव मुंबईच्या वेगाने धावणाऱ्या जीवनाशी अगदी सुसंगत आहे.

अविश्वसनीय चव: गरमागरम बटाटावडा, मऊशार पाव, सोबत लसूण आणि पुदिन्याच्या चटण्या... हे मिश्रण खाताना मिळणारी चव शब्दांच्या पलीकडची आहे.

56

वडापावने जगभरात निर्माण केली वेगळी ओळख

आज वडापाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर त्याने परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१० मध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये वडापावचा स्टॉल सुरू केला आणि आज त्यांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे.

66

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा 'आयकॉन' आहे वडापाव

'गरिबांचा बर्गर' म्हणून सुरु झालेला हा वडापाव आज मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा 'आयकॉन' बनला आहे. त्याची लोकप्रियता जगभरात पोहोचली आहे, आणि म्हणूनच २३ ऑगस्ट हा दिवस वडापाव दिनाच्या रूपात साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने वडापावने मुंबईला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख दिली आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories