Viral Video : मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. युजर्सकडून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे.
Mumbai Police : मुंबई पोलीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शहरात घडणारे गुन्हे, कायद्याबाबत जनजागृती करणे तसंच एखादी मनोरंजक पोस्ट नागरिकांसोबत शेअर करत असतात.
अशीच एक पोस्ट अलिकडेही मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे. आपल्या पेजवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर युजर्संकडून लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडण्यात येत आले.
बोरीवली पश्चिमेकडील एएचबी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर एस. कुडाळकर यांनी एका मांजरीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या मांजरीचे त्यांनी नामकरण लोला असेही केले आहे.
पोलीस स्थानकातील रोजच्या गोंधळात देखील ही मांजर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुडाळकर यांच्या खुर्चीवर पाहा किती गाढ व शांतपणे झोपून आराम करते आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तिला हळूवारपणे झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण लोला त्यांच्या खुर्चीवरून काही केल्या उठेना. लोलाला आपली झोप आवरणे कठीण होत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पोलीस आणि मांजरीमधील पक्क्या मैत्रीचे नाते दर्शवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एक लाखहून अधिक व्ह्यजु मिळाले आहेत. युजर्स कुडाळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षावही करत आहेत.
कुडाळकर यांचे प्राणीप्रेम
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर एस. कुडाळकर हे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करण्यासाठी तसेच प्राण्याबाबत जनजागृती करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांचे प्रोफाइल पाहिल्यास प्राण्यांवर कुडाळकर यांचे किती प्रेम आहे, हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल.
आणखी वाचा :
विकृती! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, शरीरावर हातोड्याने केले वार
Thane Crime : पतीने संशयातून पत्नीसह मुलांची केली निर्घृण हत्या, तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं