वंदे मेट्रोमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी हायटेक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.
धक्केमुक्त प्रवास: एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शन प्रणालीमुळे गाडी कितीही वेगात असली तरी प्रवाशांना धक्के जाणवणार नाहीत.
चार्जिंग आणि इन्फोटेनमेंट: प्रवाशांसाठी डब्यात यूएसबी चार्जिंग पॉइंट्स आणि प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी इन्फोटेनमेंट स्क्रीन असतील.
लाईव्ह मॅप: प्रवाशांना स्टेशनची माहिती देण्यासाठी रिअल-टाइम लोकेशन दाखवणारे नकाशे (Digital Maps) असतील.
मोकळी जागा: यंत्रणा डब्याच्या छत आणि तळभागावर बसवल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी अधिक जागा मिळेल.