Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबईकरांची लोकल ‘स्लो’, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळ आणि ठिकाणं जाणून घ्या

Published : Feb 07, 2026, 03:56 PM IST

Mumbai Local Mega Block: रविवार, 8 फेब्रुवारी रोजी मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहे. 

PREV
15
रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची सूचना! रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक नक्की तपासा. देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार, 8 फेब्रुवारी रोजी मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही गाड्या मार्ग बदलून धावतील. 

25
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

हा ब्लॉक सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या वेळेत लागू असेल. या कालावधीत मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि कुर्ला या स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा विचार करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

35
पश्चिम रेल्वेवर परिणाम

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान विले पार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर लोकल सेवा थांबणार नाही. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर अतिरिक्त लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

45
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील बदल

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत पनवेल ते CSMT हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द राहतील. तसेच पनवेल ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. 

55
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

प्रवाशांची अडचण कमी करण्यासाठी CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील काही सेवा सुरू राहतील. दरम्यान, पोर्ट मार्गावरील लोकल सेवा नेहमीप्रमाणे नियमित चालू राहणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवासाची योग्य आखणी करूनच घराबाहेर पडावे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories