उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा

Published : Jul 27, 2026, 10:55 AM IST
Uddhav Thackeray

सार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील 'मातोश्री' परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच विविध बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत शिंदे गटावरही अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतील 'मातोश्री' परिसरात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे असंख्य बॅनर परिसरात लावण्यात आले आहेत. पण काही बॅनरमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला आहे.

बॅनरवरील मेसेजने वेधले लक्ष 
मातोश्रीबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरवर “देव बदलणारी आमची अवलाद नाही” असा मेसेज लिहिण्यात आला आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मेसेजमधून शिंदे गटावर राजकीय टीका करण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक, विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी मातोश्री परिसरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

राजकीय संदेश देणाऱ्या बॅनरची चर्चा

यंदाच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या काही बॅनरमध्ये केवळ शुभेच्छाच नव्हे, तर सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे मेसेजही पाहायला मिळत आहेत. खासकरुन शिंदे गटाला उद्देशून करण्यात आलेल्या टीकात्मक मेसेजमुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. आज सकाळपासूनच मातोश्री परिसरात शिवसैनिकांची वर्दळ वाढली आहे. उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत. तर राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे. 

तिरंगा रॅलीत ठाकरे बंधू एकत्र
रविवारी नीट परीक्षेतील आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. याआधी राज ठाकरेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर रॅलीला संबोधित करताना ठाकरे बंधुंनी सरकावर जोरदार निशाणा साधला.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट