Mumbai Local Update : ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत, महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा संताप

Published : Jul 01, 2026, 10:45 AM ISTUpdated : Jul 01, 2026, 10:54 AM IST
mumbai local

सार

Mumbai Local Update : हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांमध्ये यामुळे संताप पाहायला मिळाला. 

Mumbai Local Update : मुंबईत कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आजही पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे हार्बर मार्गावर नेरुळ ते जुईनगर दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. अशातच पनवेलवरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. 

पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबईतील पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मालाड ते बोरिवलीदरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची स्थिती आहे. याशिवा. वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरील जोरदार पाऊस सुरू आहे. 

मुंबईतील पावसाचा अंदाज 

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, उद्या मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा IMD ने दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मुंबईत स्कूल बसवर झाडं कोसळलं, चिमुकल्याचा मृत्यू
Mumbai Crime : पेन किलरच्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, मुंबईत भयंकर प्रकार समोर