मुंबईत स्कूल बसवर झाडं कोसळलं, चिमुकल्याचा मृत्यू

Published : Jun 30, 2026, 05:20 PM IST
chembur school bus

सार

मुंबईतील चेंबूरमध्ये पावसादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे टिळकनगरच्या युनिव्हर्सल शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. पावसाच्या काळात वादळ झाल्यामुळं अनेक भागांमध्ये झाड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आता मुंबईतील चेंबूर भागातून एक दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळं एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

अपघाताच्या वेळी विद्यार्थी बसमध्ये 

अपघात झाला त्यावेळी विद्यार्थी बसमध्ये होते. गाडीवर झाड कोसळल्यामुळं गाडीचा वरचा भाग पूर्णपणे चेपला होता. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दहा शाळकरी विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. हि बस टिळकनगर भागातील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समजली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

एका विद्यार्थ्याचा झाला मृत्यू 

या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बसमधून दहा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं पण एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात यश आलं नाही. बसवर कोसळलेले झाड हे वजनदार असल्यामुळं त्याला बाजूला करण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला आहे. दहा जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Crime : पेन किलरच्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, मुंबईत भयंकर प्रकार समोर
TET Exam Paper Leak : टीईटी पेपर लीकप्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, एअरपोर्ट परिसरातून तिघांना अटक