नौपाडा येथील ठाकरे गटातील नेत्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Published : Apr 30, 2025, 10:38 AM ISTUpdated : Apr 30, 2025, 11:33 AM IST
एकनाथ शिंदे

सार

ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाच्या  २० पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ३०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंदआश्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

ठाणे - शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाचे उप विभागप्रमुख प्रितम राजपूत, उप विभागप्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखाप्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ३०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंदआश्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवरही भगवा डौलाने फडकेल असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

आज शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये शाखाप्रमुख संजय कदम, स्वप्नील नेवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडीलकर, आदित्य पंडित, यश सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नेवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव यांचा समावेश होता.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मिनाक्षी शिंदे, माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील, ठाणे सचिव बाळा गवस तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते.

-----------------------

 

PREV

Recommended Stories

BMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोठी रणनीती ठरली! फडणवीस–शिंदे बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Central Railway : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्ससाठी ४ दिवस रात्रकालीन ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल