टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरोधात दमदार विजय मिळवला. याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत 4 जुलैला भव्य परेडचे आयोजन करण्यात आले होते. पण परेडमध्ये अनेक जण जखमी झाल्याची बाब समोर आली आहे.
T-20 World Cup Parade : मुंबईत भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय क्रिकेपटूंनी आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ओपन बस विक्ट्री परेड काढली होती. परेड मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत होणार होती. अशातच लाखोच्या संख्येने चाहत्यांनी भारतीय संघाला मानवंदना देण्यासाठी गर्दी केली होती. यादरम्यान, अनेकजण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (4 जुलै) टी-20 वर्ल्ड कप जिंकलेली रोहितच्या सेनेची विजय परेड मुंबईत काढण्यात आली. यावेळी अनेक चाहते जखमी होण्यासह काहींना श्वास घेण्यासही त्रास झाल्याची बाब समोर आली आहे.
भारतीय संघाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी
एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने म्हटले की, मी ऑफिसवरुन येत होते आणि मला कळले की, भारतीय संघ संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मरिन ड्राइव्ह येथे पोहोचेल. पण तसे झाले नाही. गर्दी सातत्याने वाढत गेली. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले. काहीजण अचानक ओरडू लागल्यानंतर काही चाहते एकमेकांवर पडले. ही स्थिती अत्यंत भयंकर होती. खरंतर, घटना रात्री 8 वाजून 15 मिनिटे ते 8 वाजून 45 मिनिटांदरम्यान घडली.
दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, विजय परेडच्या वेळी मी बेशुद्ध झालो. गर्दी एवढी वाढत होती की त्यावर नियंत्रण मिळवणे मुश्किल झाले होते. मी खाली पडलो आणि मला श्वास घेण्यासही होत नव्हते. अशातच बेशुद्ध पडल्याने मला रुग्णालयात नेण्यात आले. आता माझी प्रकृती ठिक आहे.
चप्पल-शूज रस्त्यांवर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल
भारतीय संघाच्या टी-20 वर्ल्ड कप परेडवेळी चाहत्यांची गर्दी झालीच. पण मरिन ड्राइव्हच्या रस्त्याच्या कडेला हजारोंच्या संख्येने चाहत्यांचे शूज-चप्पल पडल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या मते, अनेक चाहते जखमी झाले. काहींना श्वास घेण्याचा त्रास झाला. याशिवाय काहींची प्रकृती देखील बिघडली गेली.
पंतप्रधानांची भारतीय संघाने घेतली भेट
भारतीय संघ मुंबईत दाखल होण्याआधी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भारतीय संघाला स्पेशल विमानातून भारतात आणण्यात आले होते. कारण बारबाडोस येथे हरीकॅन वादळामुळे भारतीय संघ तेथे अडकला गेला होता. अशातच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विशेष विमानाची व्यवस्था करत भारतीय संघाला मायदेशात आणले.
आणखी वाचा :