Sameer Wankhede: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसिरीजमधील एका सीनमुळे वाद निर्माण झाला आहे. या सीनमुळे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
आर्यन खान बळीचा बकरा नव्हता... ड्रग्स प्रकरणावर समीर वानखेडे यांनी केलं वक्तव्य
शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान त्याच्या नवीन वेबसिरीजमुळे चर्चेत आला आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही त्याची वेबसिरीज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिरीजमध्ये आर्यन खानच्या अटकेबद्दल एक सीन दाखवण्यात आला आहे. त्या सीनमुळे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
26
२०२१ मध्ये आर्यन खानला केली होती अटक
२०२१ मध्ये आर्यन खानला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. . “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सीरिजमधील एका दृश्यावरून झालेल्या वादानंतर समीर वानखेडे यांनी आपलं मौन सोडलं आहे. कारवाईच समर्थन करताना हाय प्रोफाइल तपासाच्या दरम्यान प्रयेक पाऊल कायद्याच्या कक्षेत येतो असं यावेळी बोलताना वानखेडे यांनी म्हटलं आहे.
36
आर्यन खानबाबत काय म्हणाले?
आर्यन खानबाबत समीर वानखेडे यांनी आर्यनबद्दल वाच्यता केली नाही. त्यांनी अंमली पदार्थांच्या तपासालाबाबत तपशीलवार सांगितलं आहे. अटकेच एकमेव कारण ड्रग्सची व्याप्ती नव्हती असं वानखेडे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे की, लोकांचा एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे तुमच्याकडे ड्रग्स आढळले नाहीतर, तुमच्यावर कारवाई होणार नाही. जर कोणाला ड्रग्ससोबत पकडलं जात आहे, तर कोणी त्याला बनवलं असेल.. कोणी तस्करी केली असेल..
56
तर कोणी ड्रग्स खरेदी केले तर...
तर कोणी ड्रग्स खरेदी केले असतील… कायद्यानुसार सखोल चौकशी केली जाईल. त्यामुळे कोणीही बळीचा बकरा नव्हता. प्रत्येक अटक इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि जबाबांवर आधारित होती.”
66
कोणत्या आरोपांच खंडन केलं?
समीर वानखेडे यांनी आरोपांच खंडन केलं आहे. त्यांनी बोलताना म्हटलं की, शा कारवायांमध्ये अनेक अधिकारी सामिल असतात. अनेक स्तरांवर चौकशी होते आणि सावधानी बाळगून कागदपत्र समोर ठेवली जातात. हे वैयक्तिक विवेकबुद्धीनुसार केलं जात नाही….