TCS layoff Update : नोकरीवरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांना 6 महिने ते 2 वर्षांचा पगार, इतरही सुविधा!

Published : Oct 03, 2025, 10:53 AM IST

TCS layoff Update : टाटा समूहाची सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. मात्र नोकरीवरुन काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ६ महिने तर २ वर्षांचा पगार देण्यात येत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जाणून घ्या…

PREV
15
कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना कंपनीने उचलले मोठे पाऊल

जगभरात होत असलेल्या या नोकरकपातीमुळे टाटा समूहावर बरीच टीका होत आहे, तसेच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे या कर्मचार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

25
या दरम्यान, TCS ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

ज्या कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान जुने झाले आहे किंवा जे नवीन कामांशी जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यांना कंपनी काढून टाकत (Layoff) आहे. कंपनी अशा कर्मचाऱ्यांना नुसते काढून टाकत नाहीये, तर त्यांना पुढील भविष्य घडवण्यासाठी आर्थिक मदत करत आहे.

या मदतीअंतर्गत, कर्मचाऱ्यांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतचा पगार दिला जात आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा रतन टाटांच्या नेतृत्वाखालील माणुसकीचे संस्कार टाटा समूहात जिवंत आहेत हे सिद्ध झाले आहे.

कंपनीने यापूर्वी १२००० कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्याची घोषणा केली होती आणि त्यांना आता दोन वर्षांपर्यंतचे 'सेव्हरन्स पॅकेज' (Severance Package) देण्याची ऑफर दिली आहे.

35
कोणाला बसणार फटका?

ज्या कर्मचाऱ्यांची भूमिका कंपनीच्या सध्याच्या गरजांशी जुळत नाहीये, त्यांना याचा थेट परिणाम होणार आहे. भविष्यात ज्यांची कौशल्ये (Skillset) कंपनीच्या आवश्यकता पूर्ण करू शकणार नाहीत, त्यांच्यावरही ही टांगती तलवार कायम राहील. या प्रक्रियेत मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील (Middle and Senior Level) कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

45
टाटांची 'पॅकेज ऑफर' काय आहे?

कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी TCS ने खालील भरपाई पॅकेज जाहीर केले आहे:

नोटीस पे (Notice Pay): बाधित कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा नोटीस पे दिला जाईल. अतिरिक्त सेवा वेतन (Severance Pay): नोटीस पे व्यतिरिक्त, त्यांना त्यांच्या कार्यकाळ आणि पदानुसार अतिरिक्त पगार मिळेल. हा कालावधी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत असू शकतो. सर्वात मोठे पॅकेज: ज्यांनी १५ वर्षांपेक्षा अधिक सेवा दिली आहे, त्यांना सर्वात मोठे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.

55
'बेंच' कर्मचाऱ्यांसाठी:

'बेंच कर्मचारी' म्हणजे जे आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणत्याही प्रोजेक्टवर नसतात. या कर्मचाऱ्यांसाठी पॅकेज साधारणपणे तीन महिन्यांच्या नोटीस पे पर्यंत मर्यादित असू शकते. मात्र, जर अशा कर्मचाऱ्यांनी १०-१५ वर्षे बेंचवर सेवा केली असेल, तर त्यांना अंदाजे १.५ वर्षांपर्यंतचा पगार मिळण्याची शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories