Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 : या पुणेकराने जपानमध्ये उभारलाय शिवाजी महाराजांचा पुतळा

Published : Jun 06, 2025, 01:07 PM IST
Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 : या पुणेकराने जपानमध्ये उभारलाय शिवाजी महाराजांचा पुतळा

सार

जपानमधील टोकियोतील कसाई भागात राहणारे एक मराठी व्यक्ती, मूळचे पुण्यातील शनिवार पेठेतील, यांनी आपल्या घराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.

टोकियो - जपानमधील टोकियोतील कसाई भागात राहणारे एक मराठी व्यक्ती, मूळचे पुण्यातील शनिवार पेठेतील, यांचा वाडा शनिवार पोलीस चौकी जवळ होता. हा व्यक्ती १९९५ मध्ये जपानची शिष्यवृत्ती मिळवून जपानला गेले आणि तेथे एका खाजगी शाळेचे मुख्याध्यापक झाले.

त्यांची आई तिथे पुरणपोळी ते साबुदाणा खिचडीपर्यंत सर्व भारतीय पदार्थ, तसेच भारतीय पोशाख शिवते आणि भारतीय उपहारगृहही चालवते.

‌‌हा व्यक्ती टोकियोमध्ये स्वतः तीन मजली प्रचंड मोठे घर बांधले. घरात मराठी पुस्तकांचे ग्रंथालय बनवले, तसेच मराठी भाषा शिकवण्याचे वर्गही घेतात. सर्व जपानी शाळांना आग्रह धरतात. हाच भारतीय मराठी माणूस जपानमध्ये नंतर तेथे आमदार झाले. अजून बरेच काही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला आहे. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करून नेला आणि ८ मार्च २०२५ ला तेथे उभारला. सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे ३०० महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित पत्रांचा संग्रह आहे.

या व्यक्तीचे नाव आहे योगेंद्र पुराणिक

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mahayuti Manifesto Mumbai : मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा आज जाहीर; महिला, युवक आणि पायाभूत सुविधांवर भर
शिवाजी पार्कवर 20 वर्षांनंतर राज–उद्धव ठाकरे एकत्र; BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन