मुंबईत 4 बांगलादेशींनी मतदान केल्याची माहिती, मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Published : Jun 11, 2024, 03:03 PM ISTUpdated : Jun 11, 2024, 03:04 PM IST
voting up

सार

मुंबईत 4 बांगलादेशींनी मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 

मुंबई: बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या 4 बांगलादेशींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दहशतवाद विरोधीपथक जुहू युनिटने चारही जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील पहिल्या दोन जणांनी लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील जोगेश्वरी येथे मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने चारही बांग्लादेशींवर कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. सह कलम १२ (१A) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन भारतीय पारपत्र प्राप्त करणाऱ्या खालील नमुद मुळच्या बांगलादेशी इसमांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या बांगलादेशींनींकडून पोलिसांनी ते सुरत, गुजरात येथे राहण्यास आहे असे पुरावा प्राप्त केले आहेत. तपासात आरोपींव्यतिरिक्त अन्य ५ जणांनीही बनावट कागदपत्र बनवल्याचे समोर आले असून पोलीस तपास करत आहेत. या आरोपीमधील एक आरोपी या बनावट कागदरपत्रांच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

कोणाला अटक केली?

१. रियाज हुसेन शेख, वय ३३ वर्षे, धंदा इलेक्ट्रिशन, रा.ठी. डी-१/८, यमुनानगर, मिल्लतनगर, लोखंडवाला, अंधेरी (प), मुंबई. (मुळ गाव :- हृदयनगर, ठाणे- बशीरहाट, जिल्हा नोवाखाली, बांगलादेश)

२. सुलतान सिध्दीक शेख, वय ५४ वर्षे, धंदा रिक्षाचालक, रा.ठी. टी-१७३, अंबुजवाडी, आझाद नगर, गेट क्र. ८, मालवणी, मालाड, मुंबई ४०००९५ (मुळ गांव सिनोदी, पो. चंदेहाट, तहसिल बाटोया, जि. सदर नोवाखाली, बांगलादेश)

३. इब्राहिम शफिउल्ला शेख, वय ४६ वर्षे, धंदा भाजी विक्रेता, रा.ठी. रूम नं. २२८, दुसरा मजला, बिल्डींग नं. ५, म्हाडा कॉलनी, माहुल गांव, मुंबई-७४. (मुळ गांवः - साहेबर हाट, कादीरपुर, ठाणा- बेगमगंज, जि. नोवाखाली, बांगलादेश)

४. फारूख उस्मानगणी शेख, वय ३९ वर्षे, रा.ठी. २०६, आर/६ गुलशननगर, ओशिवरा, जोगेश्वरी (प), मुंबई. (मुळ गांवः- कबीर हाट, मोनीनगर, जि. नोवाखाली, बांगलादेशी) अशी या आरोपींची नावे आहेत

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
BMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोठी रणनीती ठरली! फडणवीस–शिंदे बैठकीत महत्त्वाचे निर्णय