शिवसेना भवनासमोर भाजपची बॅनरबाजी, ‘मोदी ओरिजनल ब्रँड’

Published : Jun 09, 2024, 11:59 AM IST
bjp banner

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. देशभरात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे. 

भाजप नेते नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येत आहेत. यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विरोधक झालेला शिवसेना उबाठाला डिवचण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. भाजपकडून सरळ शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावले आहेत. ‘मोदी ओरिजनल ब्रँड’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामाध्यमातून उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाला डिवचण्याचा पर्यत्न केले गेला आहे.

महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे. शिवसेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी केली आहे. त्यावर मोदी ओरिजनल ब्रँड असे लिहिले आहे. शिवसेना भवन परिसरात मोदींच्या बॅनरबाजीतून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले जात आहे.

आणखी वाचा :

narendra modi cabinet: 'या' खासदारांना दिल्लीतून आले फोन, मोदी 3.0 मंत्रिमंडळात होणार समावेश

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!