बदलापूर घटनेबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या तरुणीवर पोलिसांनी केली कारवाई

बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त जमावाने रेल्वे रोको आंदोलन केले. या घटनेची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवल्याने पोलिसांनी तरुणीवर कारवाई केली आहे.

बदलापूर येथे घडलेल्या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत. या प्रकरणामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून बदलापूर रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेल्या आंदोलनातून हे दिसून आले आहे. या ठिकाणी रेल्वे रोको करण्याच आंदोलन यावेळी करण्यात आले. पोलीस, मंत्री यांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात ठेवणे शक्य झाले नाही. ही घटना घडून गेल्यानंतर सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे दिसून आले होते. 

यावेळी पीडित तरुणीबाबतची चुकीची माहिती सोशल मीडियावरून पोस्ट केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती घेऊन कारवाई केली आहे. यावेळी या व्यक्तीचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने घेतला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. 

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - 
या प्रकरणामध्ये एका २ १  वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. या मुलीचे सोशल मीडियावर पाच लाख फॉलोवर्स असून तिने चुकीची माहिती पोस्ट केली आणि पोस्ट केलेली व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यानंतर या घटनेबाबत सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणावर विरोध केल्याचं दिसून आले आहे. पीडितेच्या बाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात यावी अशी मागणी जनतेने केली आहे. 
आणखी वाचा - 
बदलापूर रेल रोकोचे राजकारण, लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न?

Share this article