
Mumbai: कल्याणमध्ये हिंदी भाषिक तरुणाकडून एका तरुणीला मारहाण करण्यात आली. या मारहाण करणाऱ्या व्यक्तीच नाव गोकुळ झा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी चोप देऊन गोकुळला पोलिसांकडे दिल आहे. कल्याण पोलिसांनी आरोपी गोकुळला अटक केली आहे.
कल्याणमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये एका तरुणीला मारहाण करण्यात आली. त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीच नाव गोकुळ झा आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारपासून हा आरोपी गायब होता. त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे.
कल्याणमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला गोकुळ झा याने मारहाण केली होती. त्याला पोलिसांनी पकडून अटक केली आहे. त्याला शेतातून पळून जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि चोपलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करून अटक करण्यात आलं. गोकुळने मुलीला पकडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गट आणि मनसेने केली होती.
गोकुळ झा हा चारच दिवसांपूर्वी ट्रक चालकाला मारहाण केल्या प्रकरणी जेल मधून जामिनावरुन सुटून आला होता. गोकुळवर विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी या दोन पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा आणि हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे, असे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरुणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.