Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक, अपघातात तिघांचा मृत्यू

Published : Jan 16, 2024, 11:27 AM ISTUpdated : Jan 16, 2024, 12:20 PM IST
Accident

सार

मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात घडल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर भीषण अपघात झाल्याची घटना आज (16 जानेवारी) घडली आहे. मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात घडला असून तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून भोईवाडा पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, वेगाने आलेल्या मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची अद्याप ओखळ पटलेली नाही. या प्रकरणात आता अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

नक्की काय घडले?
परेल पुलावर एका मोटरसायकलवरुन ट्रिपल सीट जात होते. यादरम्यान, मोटरसायकलचा ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला ती आदळली गेल्याने अपघात घडला. या अपघातात दोन तरुणी आणि एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा : 

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवर मांजरीचा ताबा, मुंबई पोलिसांनी शेअर केला VIDEO

सोशल मीडियावरील पोस्ट Like करणे इंजिनिअर तरुणाला पडले महागात, गमावले 20 लाख रूपये

मॉडेल दिव्या पाहुजा हत्येतील आरोपींना अटक, पण मृतदेहाचा शोध लागेना

PREV

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!