NMIA Update: नवी मुंबई विमानतळावरून आता २८ शहरांसाठी उड्डाण! कोल्हापूर, संभाजीनगर गाठा अवघ्या तासाभरात; पाहा पूर्ण यादी

Published : Mar 26, 2026, 09:52 PM IST

Navi Mumbai Airport Summer Schedule: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आपले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले असून, देशांतर्गत विमानसेवा १६ वरून ४६ शहरांपर्यंत विस्तारली आहे. या नवीन वेळापत्रकात २८ नवीन शहरांचा समावेश आहे.

PREV
16
नवी मुंबई विमानतळावरून आता २८ शहरांसाठी उड्डाण!

नवी मुंबई: मुंबईकरांसाठी आणि एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आपले पहिले 'उन्हाळी वेळापत्रक' (Summer Schedule) जाहीर केले असून, यामुळे देशांतर्गत विमानसेवेचा मोठा विस्तार होणार आहे. आता अवघ्या तासाभरात तुम्ही कोल्हापूर किंवा छत्रपती संभाजीनगर गाठू शकणार आहात. 

26
४६ शहरांशी कनेक्टिव्हिटी, १०९२ साप्ताहिक फेऱ्या!

२९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकात विमानतळाचा सेवा विस्तार १६ वरून थेट ४६ ठिकाणांपर्यंत करण्यात आला आहे. यामध्ये ३० नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश आहे, ज्यामुळे भारतातील प्रमुख व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रे नवी मुंबईशी जोडली जातील. 

36
कोणत्या शहरासाठी किती फेऱ्या?

दिल्ली: दररोज सर्वाधिक ९ फेऱ्या.

गोवा: दररोज ७ फेऱ्या.

बेंगळुरू: दररोज ६ फेऱ्या.

इतर शहरे: हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदूरसाठीही नियमित उड्डाणे असतील. 

46
या २८ नवीन शहरांचा यादीत समावेश, तुमचे शहर आहे का?

नवी मुंबई विमानतळावरून आता खालील शहरांसाठी विमाने झेपावतील.

छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अयोध्या, आग्रा, चंदीगड, गोवा (दाबोलीम), श्रीनगर, जम्मू, तिरुपती, त्रिवेंद्रम, पाटणा, रायपूर, डेहराडून, कोची (विझाग), मदुराई, जबलपूर, ग्वाल्हेर (हिंडन), हुबळी, बेळगाव, बरेली, बागडोगरा, भावनगर, भोपाळ, दीव-दमन, दुर्गापूर, गोरखपूर, हिरासर (राजकोट) आणि झारसुगुडा. 

56
विमान कंपन्या आणि वाढती क्षमता

सध्या या विमानतळावरून इंडिगो (IndiGo), अकासा एअर (Akasa Air) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) या कंपन्या आपली सेवा देणार आहेत. एप्रिल २०२६ पासून दैनंदिन फेऱ्यांमध्ये ७८ ने वाढ होणार असून दिवसाला सरासरी १५६ उड्डाणे होतील.

66
टियर-२ शहरांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासोबतच टियर-२ शहरांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories