BMC Property Tax Deadline: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत जाहीर केली. कर न भरणाऱ्यांवर दंड, मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असून, नागरिकांसाठी सुटीच्या दिवशीही कर भरणा केंद्रे सुरू ठेवलीत.
मुंबईकरांनो, मालमत्ता कर भरलाय का? BMC कडून ३१ मार्चची 'डेडलाईन'
मुंबई: तुम्ही अद्याप चालू आर्थिक वर्षाचा किंवा मागील थकीत मालमत्ता कर भरला नसेल, तर सावधान! बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. या मुदतीत कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर केवळ दंडच नाही, तर थेट मालमत्ता जप्तीची कडक कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. या मोहिमेबाबत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
25
१. सुटीच्या दिवशीही कर भरता येणार!
नागरिकांना कर भरताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पालिकेची नागरी सुविधा केंद्रे (CFC) सार्वजनिक सुटी आणि शनिवार-रविवारी देखील सुरू राहणार आहेत. २६, २८ आणि २९ मार्च: सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत. ३० आणि ३१ मार्च: सकाळी ८ ते चक्क रात्री १२ वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू राहतील.
35
२. ८७% कर संकलित; आता लक्ष्य थकबाकीदारांवर
२४ मार्च २०२६ पर्यंत पालिकेने निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६% म्हणजेच ६ हजार ४४९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे. आता उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ज्या मालमत्तांचा कर अद्याप आलेला नाही, त्यांच्यावर अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश सर्व वॉर्ड ऑफिसर्सना देण्यात आले आहेत.
चालू आर्थिक वर्ष (२०२५-२६) आणि मागील सर्व थकबाकी ३१ मार्चपूर्वी जमा करा. विलंबाने कर भरल्यास त्यावर अव्वाच्या सव्वा दंड आकारला जाऊ शकतो. शक्य असल्यास पालिकेच्या ऑनलाइन पोर्टलचा वापर करा किंवा जवळच्या सीएफसी (CFC) केंद्रात जाऊन रांगा टाळा.
55
प्रशासनाचा इशारा
जे मालमत्ताधारक विहित वेळेत प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्या विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.