Mumbai Weather Update : जुलैच्या पहिल्याच दिवशी ढगाळ वातावरण, कोकणात पावसाचा जोर कायम, मुंबई-ठाण्यात सतर्कतेचा इशारा

Published : Jul 01, 2025, 09:32 AM ISTUpdated : Jul 01, 2025, 09:35 AM IST

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. ठिकठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय ठाणे, नवी मुंबईत मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

PREV
15
राज्यात मान्सून सक्रिय

राज्यात मान्सून सक्रिय असून, कोकणसह मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकणात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

25
मुंबईत ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाच्या सरींची शक्यता

आज (01 जुलै) मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर शहरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव येऊ शकतो. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमान कमाल 30°C आणि किमान 27°C राहण्याची शक्यता आहे. 

35
ठाणे आणि नवी मुंबई – संध्याकाळी पावसाचा जोर

ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच नवी मुंबईतील घणसोली, कोपरखैरणे, वाशी, बेलापूर परिसरात संध्याकाळनंतर विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे ओलावा वाढलेला असून, काही ठिकाणी शेतीची कामे सुरू झाली आहेत.

45
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पालघर जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले होते. आजही ढगाळ वातावरण राहणार असून, दुपारनंतर व संध्याकाळी हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. शेतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून, शेतशिवारात ओलावा वाढत आहे.

55
कोकणात यलो अलर्ट

कोकणात ढगाळ वातावरण असून, हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात जाण्यास अडथळा नाही, मात्र किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर अधूनमधून जाणवू शकतो. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read more Photos on

Recommended Stories