Mumbai Weather Update : मुसळधार पावसाचा इशारा नाही, हलक्याच सरींचा अंदाज

Published : Jul 31, 2025, 09:10 AM ISTUpdated : Jul 31, 2025, 09:11 AM IST

मुंबई : मुंबईत गेल्या दिवसपांसून पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम स्वरुपात कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शहरात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. 

PREV
15
मुंबईकरांना दिलासा मिळणार

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे! भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये या आठवड्यात मुसळधार पावसाचा कोणताही इशारा नाही. ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत शहरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

25
मुंबईत पावसाचा जोर ओसरतोय?

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पाणी साचणे, सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, या आठवड्यात मुसळधार पावसाचा कोणताही इशारा नाही. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

35
मुंबईतील पावसाचा अंदाज

एका स्वतंत्र हवामान विश्लेषकाच्या अंदाजानुसार, आज मुंबईत सुमारे १५ मिमी पावसाची नोंद होऊ शकते. सोशल मीडियावरील प्लॅटफॉमर्म X वरील एका पोस्टमध्ये सांगण्यात आले की, “३१ जुलै, गुरुवार: अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी. पावसाचे प्रमाण: मुंबई/एमएमआर – ०-१५ मिमी.” त्याचप्रमाणे, पुणे आणि घाट भागांमध्येही हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

45
पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज
  • ३१ जुलै :  ढगाळ आकाश, मध्यम पाऊस 
  • १ ऑगस्ट : ढगाळ आकाश, मध्यम पाऊस
  • २ ऑगस्ट :  ढगाळ आकाश, हलका पाऊस
  • ३ ऑगस्ट : ढगाळ आकाश, हलका पाऊस
  • ४ ऑगस्ट : ढगाळ आकाश, पावसाची शक्यता
  • ५ ऑगस्ट : ढगाळ आकाश, पावसाची शक्यता
55
तापमानाचा अंदाज

गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, या आठवड्यात तापमान ३० अंश ओलांडणार नाही, त्यामुळे शहरात हवामान थोडं थंड आणि आरामदायक राहण्याची शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories