
मुंबई: मुंबईकरांनी लक्ष द्या! महानगरपालिकेने जाहीर केले आहे की १४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान शहरातील अनेक भागांत २२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तानसा आणि विहार जलवाहिन्यांवरील दुरुस्ती व पाइपलाइन बदलण्याचे महत्त्वाचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या काळात जलवाहिनीवरील झडपांची दुरुस्ती, बदल आणि जलवाहिन्या जोडण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
एन विभाग
राजावाडी पूर्व, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ.एन.जी.सी. वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर.एन. गांधी मार्ग –
१५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत
एल विभाग
न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी. बर्वे मार्ग (कुर्ला पूर्व), नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाईवाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, तक्षशिला नगर, व्ही.एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, चुनाभट्टी फाटक, हिल रोड, ताडवाडी, समर्थ नगर –
१४ नोव्हेंबर सकाळी १० वाजल्यापासून १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत
एम पश्चिम विभाग
टिळक नगर, ठक्कर बाप्पा वसाहत, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, गोदरेज वसाहत, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत आणि इतर परिसर.
एफ उत्तर विभाग
शीव पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा आणि चुनाभट्टीचे काही भाग.
महापालिकेने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत.
पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत पाणी साठवून ठेवा.
पाण्याचा वापर संयमाने आणि काळजीपूर्वक करा.
या दुरुस्ती कामामुळे होणाऱ्या असुविधेबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
महापालिकेने सांगितले की, या कामामुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम आणि सुरळीत होईल. त्यामुळे नागरिकांनी थोडी गैरसोय सहन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील या २२ तासांच्या वॉटर कटमुळे अनेक भागांतील नागरिकांना त्रास होणार असला तरी, हे काम शहराच्या दीर्घकालीन सोयीसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाणी आधीच साठवा आणि जबाबदारीने वापरा!