मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, लोकल सेवा विस्कळीत

Published : Jul 20, 2024, 09:08 AM ISTUpdated : Jul 20, 2024, 10:24 AM IST
Mumbai local train

सार

Mumbai Rains : मुंबईत आज (20 जुलै) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि विले पार्ले येथील सखोल भागात पाणी साचले गेले आहे. यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर पाणी तुंबल्याचा सामना करावा लागत आहे.

Mumbai Rains Update : मुंबईत शनिवारी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. आज सकाळपासून मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने प्रशासन अधिकाऱ्यांनी अंधेरी सबवे तात्पूरता नागरिकांच्या प्रवासासाठी बंद केला आहे. यामुळे नागरिकांनी एसव्ही रोडच्या माध्यमातून प्रवास करावा असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबई लोकलवर परिणाम
पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाला असल्याने हार्बर रेल्वे सेवा 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत आहे. पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची प्लॅटफॉर्मवर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

हवामान खात्याचा पावसासंदर्भातील अंदाज
हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त करत म्हटले की, मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पुढील तीन ते चार तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय भंडारदरा, नागपूर आणि वर्धा येथे विजांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

मुंबईत समुद्रात उंच लाटा येणार
मुंबई महापालिकेने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर मुंबईतील समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याची माहिती दिली आहे. यानुसार, शहरातील किनारपट्टीवरील समुद्रात सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी 4.24 मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. दुसरी उंच लाट रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी 3.66 मीटरची उसळणार आहे. यामुळे नागरिकांनी समुद्राच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे.

 

आणखी वाचा : 

मध्य रेल्वे मार्गावर 20 जुलैला रात्री स्पेशल ब्लॉक, पाहा गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई मेट्रो-3च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, तावडेंनी ट्विट करुन दाखवली पहिली झलक

PREV

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!