बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना वरळीत आणूया; मनसेची आदित्य ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी

Published : Jun 22, 2024, 12:23 PM IST
MNS posters

सार

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे. कारण आता वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत. याच पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. ठाकरे गटातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने राज ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात कोणताही उमदेवार दिला नव्हता.

वरळीतील पोस्टर्सवर नेमकं काय?

वरळीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. त्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरेंविरोधात उल्लेख करण्यात आला आहे. बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया यंदा वरळीकरांचं ठरलंय, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे.

आणखी वाचा :

Jagbudi River Flood : मुसळधार पावसाने जगबुडी नदीला पूर आल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट, नागरिकांना खबदारी घेण्याचे आवाहन

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर; इंदू मिल स्मारक पुढील वर्षी पूर्ण होणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा
Mumbai : समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनला पाहून महिलेचा चढला पारा, व्हायरल व्हिडिओ पाहून अनावर होईल राग