
Gokhale Bridge Update : मुंबईतील सीडी बर्फीवाला आणि गोखले पूलाच्या अलाइनमेंटचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. अशातच पूल येत्या 1 जुलैपासून प्रवाशांसासाठी खुला करुन दिला जाणार आहे. यामुळे अंधेरी पश्चिम ते वेस्टर्न एक्सप्रेस-वे ते जुहूपर्यंतच्या जवळजवळ 9 किलो मीटरचा प्रवास केवळ 15 मिनिटांत करता येऊ शकतो.
वाहन चालकांना वेस्टर्न एक्सप्रेस-वे वरुन तेली गली पूलासह गोखले पूलावरुन प्रवास करत बर्फीवाला पूलाच्या माध्यमातून जुहू पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. खरंतर, वाहतूकदारांना या प्रवासासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो. पण पूल सुरु झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत प्रवास करता येणार आहे. दरम्यान, 26 फेब्रुवारीला गोखले पूल वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला होता. मात्र गोखले पूल आणि अंधेरी पूर्वेकडील बर्फीवाला पूलाचादरम्यान दीड मीटरचा गॅप झाला होता. यामुळेच महापालिकेवर नागरिकांनी टीका केली होती.
गोखले पूलाच्या गॅपनंतर महापालिकेकडून दोन्ही पूलाच्या अलाइनमेंटसाठी आयआयटी, मुंबई, व्हिजेटीआय या दोघांकडून पूलाचे अलाइनेंट करण्यासाठी सर्व्हे केला होता. यानंतरच दोन्ही पूल जोडणीचे काम सुरु झाले. या पूलासाठी महापालिकेकडून 9 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
असा जोडण्यात आलाय पूल
गोखले पूलाला बर्फीवाला पूल जोडण्यासाठी हाइड्रोलिक जॅक आणि एमएस स्टूल पॅकिंगचा वापर करुन अलानइमेंट करण्यात आले आहे. सी.डी. बर्फीवाला उड्डाणपूलाचा एक भाग एका बाजूने 1397 मिमी आणि दुसऱ्या बाजूने 650 मिमी वरती उचलण्यात आला आहे. या अलाइनमेंटसाठी दोन महिन्याचा कालावधी लागला आहे. बर्फीवाला उड्डाणपूलाखाली पेडस्टल्स (सपोर्टिंग पिलर) वापरण्यात आले आहेत.
पूल जोडणीचे काम वेगाने सुरु
बर्फीवाला उड्डाणपूलाला गोखले पूलाला न जोडण्याच्या निर्माण झालेल्या वादानंतर महापालिकेकडून पूल जोडणीचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहेत. एक भाग जोडल्यानंतर दुसरा भागही लवकरच जोडला जाईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, "1 जुलैला गोखले-बर्फीवाला पूल सुरु केल्यानंतर आमचा प्रयत्न असेल गोखले पूलाच्या दुसऱ्य भागाचे कामही पूर्ण करायचे आहे. आम्ही पूलाचा दुसरा भाग 31 मार्च, 2025 पर्यंत वाहतूकीसाठी सुरु करमण्याचा विचार केला आहे. याचे 50 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हा गोखले पूलाचा दक्षिण भाग असल्याने सुरु केल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी खूप कमी होऊ शकते."
आणखी वाचा :
Manoj Jarange: लक्ष्मण हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप