Maharashtra Rain Updates : मुंबईत पुढच्या दोन-तीन तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Updates : मुंबईसह उपनगरांत पुढच्या दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 19, 2024 7:49 AM IST / Updated: Jun 19 2024, 01:20 PM IST

मुंबई : राज्यभरात मान्सूनची चाहूल लागली आहे. अनेक भागांत तर पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत परतल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी रात्रीपासूनच अनेक भागांत पावसानं हजेरी लावली. त्यानंतर काही भागांत पावसानं पुन्हा दडी मारल्याचे पाहायला मिळाले. अशातच बुधवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अशातच आता पुढचे 2 ते 3 तास मुंबई, नवी मुंबई ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

हवामानतज्ञ होसाळीकर यांनी ट्वीटवरुन दिलेल्या माहितीनुसार, आज 19 जूनला दुपारी 12 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर (वसई, वाडा), रायगडसह नवी मुंबई पनवेलमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

 

Share this article