मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! उघड्या नाल्यांबाबत 179 तक्रारी अजूनही प्रलंबित

Published : Jul 17, 2026, 10:10 AM IST
Open Gutter

सार

मुंबईतील उघडी व तुटलेली नाल्यांची झाकणे हा गंभीर प्रश्न बनला आहे. महापालिकेकडे यासंदर्भात 190 तक्रारी दाखल झाल्या आहेत. पण फार कमी तक्रारींचे निवारण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई :  मुंबईतील उघडी, तुटलेली किंवा गायब झालेली नाल्यांची झाकणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरतात. यासंदर्भात वारंवार महापालिकेकडे तक्रार दाखल केली जाते. तरीही काही तक्रारींचे निवारण होते तर काहींचे होत नाही. अशातच महापालिकेकडून अद्याप मुंबईतील जवळजवळ शेकडोहून अधिक उघड्या नाल्यांच्या झाकणासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.  

तक्रारींचा पाऊस

पावसाळ्यात उघडी किंवा तुटलेली नाल्यांची झाकणे नागरिकांसाठी जीवघेणी ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने तक्रारी नोंदवण्यासाठी विशेष क्रमांक उपलब्ध करून दिला होता. या क्रमांकावर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

190 पैकी 179 तक्रारी अद्याप प्रलंबित

महापालिकेकडे आतापर्यंत 190 तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र त्यापैकी केवळ काही तक्रारींचेच निवारण झाले आहे. यापैकी अजून 179 तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यात वाढली धोक्याची शक्यता

मुंबईतील पावसात उघड्या किंवा तुटलेल्या झाकणांमुळे अपघात होऊ शकतात. खासकरुन रात्रीच्या वेळी आणि पाण्याखाली झाकणे दिसत नसल्याने नागरिकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच अंधेरीत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Akasa Air Viral Video : मुंबई एअरपोर्टवर प्रवाशाची बॅग फुटली, अकासा एअरच्या कर्मचाऱ्यांच्या उत्तराने संताप
Bombay High Court: नातेवाईकांच्या घरी धुणी-भांडी करायला सांगणे हा छळ नाही, हायकोर्टाचा निकाल