Tukaram Mundhe effect | पारशी डेअरीच्या रेडमध्ये दिसले इतर कंपन्यांचे रिफांईंड ऑईल आणि तूप

Published : Jul 16, 2026, 09:03 PM IST
tukaram munde

सार

मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरीवर एफडीएने टाकलेल्या धाडीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महागड्या दुग्धजन्य पदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या डेअरीत दुसऱ्या कंपन्यांचे तेल आणि तुपाचे डबे सापडल्याने भेसळीचा संशय बळावला आहे. या प्रकरणामुळे ग्राहकांच्या विश्वासाला मोठा तडा गेला असून, एफडीएच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई: मुंबईतल्या पारशी डेअरीत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना ग्राहक चांगली किंमत मोजतात, स्वतच्याच गाई असल्याचा त्यांचा दावा आहे, म्हणून ग्राहकही विश्वासाने त्यांची उत्पादनं खरेदी करतात, पण एफडीएने टाकलेल्या धाडीत जे फोटो समोर आले आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न पडले आहेत. या फोटोंमध्ये फॉर्च्युन रिफाईंड ऑईलचे डबे, कृष्णा तुपाचे डबे दिसून आले आहेत. जर पारशी डेअरी हा स्वत उत्पादक आहे, तर हे फॉर्च्युन रिफाईंड ऑईल आणि कृष्णा तुपाच्या खोक्यांचे येथे काय काम आहे. विशेष म्हणजे एफडीएकडून अजूनही अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही की इतर कंपनीचे प्रॉडक्ट तिथे दिसून आले.

डेअरीचे प्रोडक्ट दुपटीने महाग

इतर दुग्ध पदार्थांच्या मानाने पारशी डेअरीचे प्रॉडक्ट हे दुपटीने महाग आहेत. जर फोटोत दिसत असलेल्या पदार्थांचा यात वापर होत असेल, तर ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे. कारण रिफाईंड ऑईल या पदार्थांमध्ये मिक्स तर केले जात नाही ना, केले जात होते का, याची उत्तरं एफडीएने देणे गरजेचे आहे. कारण अनेक ग्राहक आरोग्य सांभाळण्यासाठी ही महागडी उत्पादन विकत घेत असतात. एकंदरीत सध्याची जी रेड पडली त्यातून तर पारशी डेअरी त्या मोजलेल्या पैशांएवढा विश्वास देऊ शकलेली नाही.पारशी डेअरीची या आधी अधिकाऱ्यांनी का चौकशी केली नाही, या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची गरज आहे.

टर्नओव्हर कोट्यावधी 

पारशी डेअरीचा टर्न ओव्हर हा कोट्यवधी रुपयांवर आहे, पारशी डेअरीची उत्पादनं आता फक्त दिखावू आहेत की अजूनही दर्जा टिकून आहे, याबाबतीत पारशी डेअरीने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. तुकाराम मुंडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आल्यानंतर भल्या भल्यांना फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी के रुस्तम या आईस्क्रीम पार्लरमध्येही अशीच घाण दिसून आली आहे. एकंदरीत दक्षिण मुंबईत नावावर अव्वाच्या सव्वा पैसे घेणारे हे आता ब्रॅण्ड राहिलेले नाहीत, तर पैसे ओरबाडणारी दुकानं झाली आहेत, असं तरी सध्याचं चित्र आहे. मुंबईत अजूनही अनेक ठिकाणी बडे ब्रॅण्ड स्वच्छता राखत नसल्याचं दिसून येत आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Airport T1: मुंबई एअरपोर्टच्या T1 च्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा
Cordelia Cruises : 1500 ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचं आकाश उजळलं; कॉर्डेलिया क्रूझेसकडून दुसरं जहाज ‘कॉर्डेलिया स्काय' सादर