
Mumbai Marathi Schools Shuts : गेल्या 10 वर्षांमध्ये मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमातील 100 हून अधिक शाळा बंद झाल्याची बाब समोर आली आहे. यापैकी 40 शाळा गेल्या सहा वर्षांमध्ये बंद झाल्या आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या 50 हजारांहून कमी झाली. खरंतर, पालक सध्या त्यांच्या मुलांना अन्य शालेय बोर्ड किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतात.
दरम्यान, साउथ मुंबईमध्ये 2019 ते 2025 दरम्यान मराठी शाळा बंद झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच एकूण शाळांच्या अर्ध्या शाळांची संख्या कमी झाली. नुकतीच दादरमधील नाबर गुरुजी शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळेमध्ये 6 ते 10 पर्यंतचे शिक्षण घेता येत होते.
वर्ष 2019-20 च्या काळात मुंबईतील 461 मराठी शाळा बंद झाल्या. तर वर्ष 2024-25 मध्ये देखील शाळा बंद झाल्याचे प्रकरणे समोर आली आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे घटती मुलांची संख्या आहे. जवळजवळ 135,000 विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत होते.