Mumbai Metro 3 Timing : मुंबई मॅरेथॉनसाठी मेट्रो ३ सज्ज! १८ जानेवारीला धावणार 'स्पेशल मेट्रो'; पहा पहाटेचे नवीन वेळापत्रक

Published : Jan 17, 2026, 07:42 PM IST

Mumbai Metro 3 Timing : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी मुंबई मेट्रो ३ ने विशेष सोय केली आहे. १८ जानेवारी रोजी, अ‍ॅक्वा लाईनवर पहाटे ३:३० वाजल्यापासून अतिरिक्त मेट्रो सेवा चालवल्या जाणार आहेत. 

PREV
14
मुंबई मॅरेथॉनसाठी मेट्रो ३ सज्ज! १८ जानेवारीला धावणार 'स्पेशल मेट्रो'

मुंबई : उद्या रविवार, १८ जानेवारी रोजी होणाऱ्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६' साठी मुंबई मेट्रो ३ प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटूंना वेळेत पोहोचता यावे, यासाठी अ‍ॅक्वा लाईन (मेट्रो ३) वर पहाटेपासूनच अतिरिक्त सेवा चालवल्या जाणार आहेत. 

24
पहाटे ३:३० वाजल्यापासून पहिली फेरी!

साधारणपणे सकाळी उशिरा सुरू होणारी मेट्रो उद्या मॅरेथॉननिमित्त पहाटेच रुळावर धावणार आहे. नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

पहिली मेट्रो: पहाटे ३:३० वाजता (आरे JVLR आणि कफ परेड या दोन्ही टोकांवरून एकाच वेळी सुटेल).

दुसरी मेट्रो (आरे कडून): पहाटे ४:३० वाजता.

दुसरी मेट्रो (कफ परेड कडून): पहाटे ४:५० वाजता. 

34
मॅरेथॉन आणि मेट्रोचे कनेक्शन

टाटा मुंबई मॅरेथॉनची सुरुवात पहाटे ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून होणार आहे. दक्षिण मुंबईत जाण्यासाठी धावपटूंना 'अ‍ॅक्वा लाईन' अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

मेट्रो प्रशासनाचा संदेश: “मॅरेथॉनसाठी लवकर प्रवास करणाऱ्या धावपटूंनी जलद, सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी मेट्रो ३ चा लाभ घ्यावा. तुमच्या सुविधेसाठी आम्ही १८ जानेवारीला अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.” 

44
प्रवाशांसाठी महत्त्वाची टीप

जर तुम्ही उद्या विकेंडसाठी बाहेर पडणार असाल किंवा कामावर जाणार असाल, तर सकाळी धावणाऱ्या या जास्तीच्या फेऱ्यांमुळे तुमचा प्रवास अधिक सोपा होईल. मेट्रोच्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून या बदलांची पुष्टी करण्यात आली आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories