Mumbai Local : मुंबई लोकलचा 'लेटमार्क' मिटणार! मध्य रेल्वेचा मोठा मास्टरप्लॅन; आता लोकल धावणार सुसाट

Published : Jan 15, 2026, 05:13 PM IST

Mumbai Local : मध्य रेल्वेने मुंबई लोकलचा 'लेटमार्क' मिटवण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे. यानुसार, सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे वळवल्या जाणार आहेत. 

PREV
15
मुंबई लोकलचा 'लेटमार्क' मिटणार! मध्य रेल्वेचा मोठा मास्टरप्लॅन

मुंबई : दररोज सकाळी लोकलच्या लेटमार्कमुळे ऑफिसला उशिरा पोहोचणाऱ्या आणि गर्दीत भरडल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे आता लोकलचा प्रवास अधिक सुखकर आणि वेळेवर होणार आहे. 

25
काय आहे रेल्वेचा नवा 'प्लॅन'?

मध्य रेल्वेवर सकाळी पीक अवर्समध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकलच्या वेळापत्रकाचा मोठा बोजवारा उडतो. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी, सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या आता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) कडे वळवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. 

35
नेमकी अडचण कुठे येते?

मार्गिकेची कमतरता: कल्याण ते विद्याविहार दरम्यान सहावी मार्गिका असल्याने एक्स्प्रेस गाड्या स्वतंत्र धावतात. मात्र, विद्याविहारच्या पुढे स्वतंत्र मार्ग नसल्याने या गाड्यांना लोकलच्या ट्रॅकवर वळवावे लागते.

साखळी परिणाम: उत्तर भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेस उशिरा आल्या की त्यांच्या मागे असणाऱ्या लोकल गाड्यांना 'आऊटर'ला थांबावे लागते. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊन प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होते. 

45
पंचवटी एक्स्प्रेसचा मार्ग बदलणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रस्तावात प्रवाशांच्या पसंतीची पंचवटी एक्स्प्रेस आणि इतर काही महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या विद्याविहारहून थेट एलटीटीकडे वळवल्यास सीएसएमटीकडे जाणारा मुख्य मार्ग मोकळा होईल. यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी किमान तीन नवीन लोकल गाड्यांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. 

55
प्रवाशांना होणारे फायदे

वेळेचे गणित जुळणार: एक्स्प्रेसचा अडथळा दूर झाल्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात अचूकता येईल.

गर्दीतून सुटका: गाड्या वेळेवर धावल्यामुळे स्थानकांवरील गर्दी विभागली जाईल.

तणावमुक्त प्रवास: 'गाडी वेळेवर येईल का?' या चिंतेतून मुंबईकरांची कायमची सुटका होईल.

रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी देताच, टप्प्याटप्प्याने या बदलांची अंमलबजावणी सुरू केली जाईल. यामुळे मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास सुसह्य होणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories