Mumbai Local : पश्चिम रेल्वेने मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १०५ नॉन-एसी लोकलमध्ये हा बदल होणार असून, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी डब्यात विशेष सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.
Senior Citizen Special Coach In Mumbai Local : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने लोकल गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आणि आरक्षित डबा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
25
105 नॉन-एसी लोकलमध्ये होणार बदल
रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार पश्चिम रेल्वेच्या 105 नॉन-एसी लोकल गाड्यांमध्ये हा बदल टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत लगेजसाठी वापरात असलेल्या डब्याच्या रचनेत बदल करण्यात आला असून, तो डबा आता फक्त ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी राखीव असणार आहे.
35
हा खास डबा ओळखायचा कसा?
ज्येष्ठ नागरिकांना हा डबा सहज ओळखता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये सहाव्या क्रमांकावर हा ज्येष्ठ नागरिकांचा खास डबा असेल. त्यामुळे गर्दीत योग्य डबा शोधण्याचा त्रास कमी होणार आहे.
या विशेष डब्याची रचना पूर्णपणे प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षिततेचा विचार करून करण्यात आली आहे.
तीन 3-सीटर बेंच
दोन 2-सीटर युनिट्स
एकूण 13 प्रवाशांसाठी बसण्याची सोय
सुमारे 50 पेक्षा अधिक प्रवासी उभे राहू शकतील इतकी जागा
55
सुरक्षिततेसाठी विशेष उपाय
या डब्यात सुरक्षिततेसाठीही महत्त्वाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. डब्याच्या दोन्ही दरवाजांच्या अंडरफ्रेमवर आपत्कालीन शिडी बसवण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना ती उपयोगी ठरणार आहे.