Mumbai Local : मुंबईची लोकल थांबणार का? लाईफलाईनचे सारथी थकले; मोटरमनचा थेट इशारा

Published : Dec 21, 2025, 04:49 PM IST

Mumbai Local : मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर कामाचा वाढता ताण, अपुरे मनुष्यबळ आणि सुविधांच्या अभावामुळे संतप्त झाले आहेत. त्यांनी चर्चगेट येथे निषेध बैठक घेऊन, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

PREV
17
मुंबईची लोकल थांबणार का?

Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे रोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते. मात्र ही लोकल चालवणारे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर प्रचंड कामाच्या ताणाखाली दबले गेले असून, आता त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाचा वाढता दबाव, मनुष्यबळाची कमतरता आणि दुर्लक्षित प्रश्नांमुळे पश्चिम रेल्वेतील रनिंग स्टाफ संतप्त झाला आहे. 

27
चर्चगेटमध्ये कर्मचाऱ्यांचा संताप

पश्चिम रेल्वेतील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या लॉबीमध्ये निषेध बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र टीका करण्यात आली. “लोकल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करतो, पण आमच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे,” असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. 

37
वाढता ताण, डबल ड्युटी आणि अपुरी मनुष्यबळ

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,

अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच कर्मचाऱ्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत

नियमित सुट्ट्या न देता सलग आणि डबल ड्युटी करायला भाग पाडले जात आहे

सततच्या दबावामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा वाढत आहे

या परिस्थितीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 

47
विश्रांती नाही, आरोग्यावर परिणाम

सलग काम, अपुरी विश्रांती आणि कायमचा ताण यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक थकवा, शारीरिक कमजोरी आणि आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. तरीही प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संताप अधिक तीव्र झाला आहे. 

57
7 महिन्यांपासून कॅन्टीन बंद

कर्मचाऱ्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. चर्चगेट येथील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरसाठी असलेले कॅन्टीन गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. दीर्घ ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नाराजी आणखी वाढली आहे. 

67
प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका?

कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, थकलेल्या आणि मानसिक ताणाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांकडून लोकल चालवून घेणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा प्रश्न केवळ कर्मचाऱ्यांचा नसून, मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासाशी थेट संबंधित आहे. 

77
आंदोलनाचा स्पष्ट इशारा

जर मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या नाहीत, तर पश्चिम रेल्वेतील सर्व कर्मचारी संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा थेट इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. या निषेध बैठकीला मोठ्या संख्येने मोटरमन, ट्रेन मॅनेजर आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories