मुंबई: मुंबईकरांनो, दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर तुमचा प्लॅन आधीच पुन्हा एकदा तपासा. येत्या रविवारी (12 ऑक्टोबर 2025) मुंबईच्या हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महत्त्वाचे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्या रद्द केल्या जातील, तर काहींच्या मार्गात तात्पुरते बदल होणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने हा मेगाब्लॉक दुरुस्ती व देखभाल कामांसाठी घेतला असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खात्री करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.